व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

स्वाधार योजना पात्रता व अर्ज प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

1- ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

2- दहावी आणि बारावीनंतर प्रवेश घेतलेला जो काही अभ्यासक्रम असेल तो दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीचा नसावा.

3- तसेच या विद्यार्थ्यांना 60% गुण असणे गरजेचे आहे व दिव्यांग विद्यार्थ्या असेल तर त्यांना 40 टक्के गुण असावेत.

4- तसेच सदर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे व त्याचे स्वतःचे बँकेत खाते असावे

स्वाधार योजनेंतर्गत मिळणारी मदत

  • बोर्डिंग सुविधा – 28,000 रुपये
  • निवास सुविधा – 15,000 रुपये
  • विविध खर्च – 8,000 रुपये
  • वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी 5,000 रुपये (अतिरिक्त)
  • इतर शाखा – 2,000 रुपये (अतिरिक्त)
  • एकूण – ५१,००० रुपये

असा करा अर्ज…..

ज्या उमेदवारांना या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ते अर्जाची PDF काढून सहजपणे अर्ज करू शकतात. येथे आम्ही तुम्हाला योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी काही स्टेप्स सांगत आहोत. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अर्ज करू शकता.

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇

  • सर्वप्रथम उमेदवाराने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • तुमच्या स्क्रीनवर होम पेज उघडेल. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना फॉर्म PDF ची लिंक होम पेजवर देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करा.
  • तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर PDF फॉर्म उघडेल.
  • हा फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
  • प्रिंट आऊट घेतल्यानंतर अर्जात सर्व माहिती भरा आणि अर्जासोबत तुमच्या अभ्यासक्रमांनुसार सर्व कागदपत्रे जोडा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागाकडे सबमिट करा. • कर्मचाऱ्यांनी तुमचा अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी

केल्यानंतर सरकारकडून तुमच्या बँक खात्यावर आर्थिक मदत

पाठवली जाईल.

  • अशा प्रकारे या योजनेअंतर्गत तुम्ही अगदी सहजपणे आर्थिक

मदत मिळवू शकता.

Leave a Comment