व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

म्हैस पालनात शेतकऱ्यांसाठी म्हशीची कोणती जात राहील फायदेशीर! मुर्रा की जाफराबादी?

Buffalo Species:- भारतामध्ये शेती आणि त्या शेतीला असलेली जोडधंदे ही एक खूप जुनी परंपरा आहे. पशुपालनामध्ये प्रामुख्याने गाय आणि म्हशींचे पालन संपूर्ण देशात केले जाते. कारण गाय आणि म्हशीच्या दुधापासून आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत असते. जर आपण गाय आणि म्हशीच्या दुधाची तुलना केली तर यामध्ये म्हशीच्या दुधाला जास्त प्रमाणात प्राधान्य दिले जाते.

त्यामुळे भारतामध्ये दूध उत्पादनाकरिता गाईंपेक्षा म्हशीचे पालन मोठ्या प्रमाणावर होते. तर तुम्हाला देखील म्हैस पालन सुरू करायचे असेल तर यामध्ये दोन जाती खूप फायद्याच्या ठरू शकतात व या माध्यमातून जास्तीचे दूध उत्पादन मिळवून तुम्ही भरपूर नफा मिळवू शकाल. त्यामुळे आपण मुर्रा आणि जाफराबादी या म्हशींच्या दोन जातींबद्दल तुलनात्मक दृष्ट्या माहिती घेणार आहोत.

 मुर्रा जातीच्या म्हशीची ओळख आणि वैशिष्ट्ये

1- ही म्हशीची जगातील सर्वात उत्कृष्ट अशी दुभती जात आहे.

2- ही म्हैस भारतातील सर्वच ठिकाणी आढळून येते. परंतु प्रामुख्याने दिल्ली, पंजाब आणि हरियाणा मध्ये या म्हशीचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते.

3- या जातीच्या म्हशीची शिंगे वाकडी असतात.

4- ह्या म्हशीचा रंग काळा असतो.

https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-4376290373566816&output=html&h=327&slotname=6655742069&adk=839168350&adf=2830872498&pi=t.ma~as.6655742069&w=393&lmt=1706677068&rafmt=1&format=393×327&url=https%3A%2F%2Fahmednagarlive24.com%2Fkrushi%2Fbuffalo-species-read-here-important-inforamation-regarding-murha-and-jafrabadi-buffalo%2F&fwr=1&fwrattr=true&rpe=1&resp_fmts=3&sfro=1&wgl=1&uach=WyJBbmRyb2lkIiwiMTMuMC4wIiwiIiwiMjMwNzZSTjRCSSIsIjEyMC4wLjYwOTkuMjMxIixudWxsLDEsbnVsbCwiIixbWyJOb3RfQSBCcmFuZCIsIjguMC4wLjAiXSxbIkNocm9taXVtIiwiMTIwLjAuNjA5OS4yMzEiXSxbIkdvb2dsZSBDaHJvbWUiLCIxMjAuMC42MDk5LjIzMSJdXSwwXQ..&dt=1706677062524&bpp=35&bdt=1916&idt=5732&shv=r20240124&mjsv=m202401250101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D6421d1c4b83f0342%3AT%3D1700577035%3ART%3D1706632982%3AS%3DALNI_MafiY-cAYPLpP1atF-4q9Ps8dzdCQ&gpic=UID%3D00000c9213bc09eb%3AT%3D1700577035%3ART%3D1706632982%3AS%3DALNI_MbB4fseg0nwte4EkxIzbMZSptIMfQ&eo_id_str=ID%3Dc28b818337bfc068%3AT%3D1706621601%3ART%3D1706632982%3AS%3DAA-Afjall8ud6ISflZRbqUsoBvR9&prev_fmts=0x0%2C393x327%2C393x327%2C393x327%2C393x327&nras=1&correlator=7698943287423&frm=20&pv=1&ga_vid=1164112410.1700577034&ga_sid=1706677065&ga_hid=2002248457&ga_fc=1&u_tz=330&u_his=1&u_h=895&u_w=393&u_ah=895&u_aw=393&u_cd=24&u_sd=2.75&dmc=4&adx=0&ady=3085&biw=393&bih=754&scr_x=0&scr_y=510&eid=44759875%2C44759926%2C44809531%2C95321958%2C95320869%2C95320889%2C95323006%2C31078663%2C31078665%2C31078668%2C31078670&oid=2&pvsid=768433271086030&tmod=897137326&uas=3&nvt=2&ref=https%3A%2F%2Fahmednagarlive24.com%2Fkrushi%2Fbuffalo-species-read-here-important-inforamation-regarding-murha-and-jafrabadi-buffalo%2F&fc=1920&brdim=0%2C0%2C0%2C0%2C393%2C0%2C393%2C754%2C393%2C754&vis=1&rsz=%7C%7CeEbr%7C&abl=CS&pfx=0&fu=128&bc=31&bz=1&td=1&psd=W251bGwsbnVsbCxudWxsLDNd&nt=1&ifi=6&uci=a!6&btvi=4&fsb=1&dtd=5788

5- मुरा म्हशीचे डोके लहान आणि लांब शेपूट असते तसेच मागील भाग हा चांगला विकसित झालेला असतो.

6- या म्हशीच्या डोक्यावर, शेपटीवर आणि पायावर देखील सोनेरी रंगाचे केस आढळतात.

7- या म्हशीचा गर्भधारणा कालावधी सुमारे 310 दिवसांचा असतो व ही दररोज 20 ते 30 लिटर दूध देते.

 जाफराबादी म्हशीचे वैशिष्ट्ये

1- जाफराबादी म्हशी सहसा काळ्या रंगाच्या असतात. तर काही या राखाडी रंगाच्या देखील असतात.

2- तसेच या जातीच्या म्हशीच्या शरीराचा आकार हा इतर जातींच्या म्हशीपेक्षा खूप मोठा आणि मजबूत असतो.

3- जाफराबादी जातीच्या म्हशीचे शिंगे लांब व वक्र असतात.

4- तसेच कान लांब, पायाची खूर काळी, डोके व मान जड व शेपटीचा रंग काळा असतो.

5- जाफराबादी म्हशीच्या कपाळावर पांढरे निशाण असतात जे तिची खरी ओळख मानली जाते.

6- जाफराबादी म्हशीच्या कपाळावर पांढरे निशान असते व ही तिची खरी ओळख मानली जाते.

7- या म्हशीचे तोंड दिसायला लहान असते व त्वचा मऊ व सैल असते.

8- ही म्हैस दररोज 20 ते 30 लिटर दूध देऊ शकते व एका बछड्यात 1800 ते 2000 लिटर दूध देते.

9- या म्हशीच्या शरीराचे सरासरी वजन 750 ते 1000 किलो पर्यंत असते.

मुरा म्हैस जास्त दूध देते की जाफराबादी?

जर आपण म्हशींच्या या दोन्ही जातींचा विचार केला तर जाफराबादी म्हैस दररोज 25 ते 30 लिटरपर्यंत दूध देते. तसेच मुर्रा म्हैसही प्रत्येक दिवसाला 30 लिटरपर्यंत दूध देते. म्हणजे यावरून आपल्याला दिसून येते की दोन्ही म्हशीचे दूध उत्पादन क्षमता ही जवळ जवळ सारखी आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा आर्थिक बजेट स्थानिक परिस्थितीचा विचार करून निवड करू शकतात.

किती असते या म्हशीची किंमत?

जर आपण किमतींचा विचार केला तर जाफराबादी म्हैस ही कमीत कमी 90 हजार ते दीड लाख रुपये पर्यंत मिळते. तर मुर्रा जातीची म्हैस ही 50 हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयापर्यंत मिळते.

Leave a Comment