व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पंतप्रधान मोदींकडून किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता जाहीर, तुमच्या खात्यात पैसे आले की नाही?

पीएम किसान सन्मान निधी ही जगातील सर्वात मोठी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात, असंही १४ वा हप्ता जारी करताना ते म्हणाले.

PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता जारी केला आहे. राजस्थानमधील सीकर येथील एका कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये पाठवणार असल्याचं सांगितलं आहे. पीएम किसान सन्मान निधी ही जगातील सर्वात मोठी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात, असंही १४ वा हप्ता जारी करताना ते म्हणाले. १४ व्या हप्त्यापर्यंत २ लाख ६० हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले आहेत.

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला मेसेज तपासा

PM किसानचा १४ वा हप्ता जारी झाल्यानंतर योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये हस्तांतरित केल्याचा मेसेज आलेला असेल.

मिनी स्टेटमेंट किंवा खाते बॅलन्स तपासू शकता

जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हप्त्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही काही काळ वाट पाहू शकता. त्यानंतरही मेसेज आला नाही तर तुम्ही एटीएममध्ये जाऊन तुमचे मिनी स्टेटमेंट काढू शकता किंवा खात्यातील बॅलन्स तपासू शकता. याशिवाय पासबुकमध्ये एंट्री करून तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे देखील तुम्ही पाहू शकता.

तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारेदेखील बॅलन्स तपासू शकता

जर तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगची सुविधा वापरत असाल तर तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक किंवा खाते स्टेटमेंट स्वतःही ऑनलाइन तपासू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या बँकेच्या मिस्ड कॉल नंबरवर मिस्ड कॉल देऊन खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकता.

Leave a Comment