जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सर्वप्रथम अगोदर ‘गुगल क्रोम’ब्राऊजरवर असणाऱ्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
वेबसाइटच्या डाव्या बाजूला ‘Location’ हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरीमध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर ‘रूरल’ हा पर्याय निवडावा आणि शहरी भागात राहत असेल, तर ‘अर्बन’ हा पर्याय निवडा. (Shet Jamin Nakasha Online)
यानंतर, तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून सगळ्यात शेवटी ‘व्हिलेज मॅप’वर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर शेतजमीन ज्या गावात येते या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होईल. अशाप्रकारे तुम्ही जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहू शकता. आता जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढायचा जाणून घेऊ या.. (Jamin Naksha Download)
आता तुमच्यासमोर जमिनीची नकाशा ओपन झालेला आहे. या पेज वर ‘सर्च बाय प्लॉट नंबर’ या नावाने एक रकाना दिसेल. येथे तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावर असलेला गट क्रमांक टाकायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या जमिनीचा नकाशा उपलब्ध होतो. अशाप्रकारे तुम्ही जमिनीचा नकाशा काढू शकता.