Suryodaya Yojana : पंतप्रधान मोदी यांनी 22 जानेवारीला पंतप्रधान सूर्योदय योयनेची घोषणा केली आहे. या योजनेची पात्रता आणि अर्ज करण्यासंदर्भात सर्व माहिती आणि तपशील जाणून घ्या.
Pradhanmantri Suryoday Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला आणखी एक भेट दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी 22 जानेवारीला पंतप्रधान सूयोदय योजनेची (Pradhan Mantri Suryoday Yojana) घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या योजनेबाबत माहिती दिली आहे.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज कोठे करावा हे पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा (Pradhan Mantri Suryoday Yojana)
अयोध्येतील (Ayodhya Ram Temple) राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन योजना जाहीर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेत लोकांना वीज बिलातून दिलासा मिळणार आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे वीज बिल कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेबाबत सविस्तर माहिती आणि तपशील जाणून घ्या.
पंतप्रधान सूर्योदय योजना काय आहे? (What is Pradhan Mantri Suryodaya Yojana)
पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत (What is PM Suryodaya Yojana) सरकारकडून एक कोटीहून अधिक घरांवर सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहे. देशात दुर्गम भागातील घराघरात वीज पोहोचावी आणि वीज बिलाचा भार कमी व्हावा, यासाठी सरकारकडून ही खास योजना राबवण्यात येत आहे. घरावर बसवलेल्या सोलर पॅनल सिस्टिममुळे वीजनिर्मितीचं साझन उपलब्ध होणार आहे, या वीजेचा वापर घरगुती कामात करता येईल. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
योजनेची पात्रता (PM Suryodaya Yojana Eligibility)
- या योजनेचा लाभ फक्त भारतीयांनाच मिळणार आहे.
- या योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 किंवा 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं.
- अर्ज करताना सर्व कागदपत्रे बरोबर असणे आवश्यक आहे.
- अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेशी संबंधित नसावा.