महाराष्ट्रासह, तामिळनाडू, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता
वादळी वारे आणि गारपिटीसह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे फळबांगानांही मोठा फटका बसला असून, पुढील काही तासांसाठी राज्यात वादळाचे इशारे देण्यात आले आहेत. राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे.
हवामान विभागाने पुण्यासह नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच आज विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्याच्या काही भागांमध्ये आजही पावसाचीही शक्यता आहे.
आज राज्यभरात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही भागात पादरम्यान आज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तामिळनाडू, पुद्दुचेरी , कराईकल , केरळ आणि माहे या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी केलेल्या पिकांना गारांचा आणि पावसाचा मोठा फटका आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तामिळनाडू, पुद्दुचेरी , कराईकल , केरळ आणि माहे या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.