व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

राज्यासह देशभरात थंडी वाढली, या भागात पावसाची शक्यता

राज्यासह देशभरातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. खासकरून उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये तापमान 4 अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.

राज्यासह देशभरातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. खासकरून उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये तापमान 4 अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.

उत्तर भारतात थंडी वाढल्याने महाराष्ट्रातील तापमानही घसरले आहे. शनिवारी (16 डिसेंबर) नगर जिल्ह्यातील जेऊर येथे या वर्षातल्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या भागात 10.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात आणखी घट होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांत देखील गारठा वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे

जेऊरसह राज्याच्या इतर भागातही तापमान चांगलेच घसरले आहे. परभणीत 11 अंश सेल्सिअस, यवतमाळ येथे 11.5 अंश सेल्सिअस, तर निफाड येथे 11.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या इतर भागातही रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. तसेच बहूतांशी भागात धुक्याची चादरही पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाटही पाहायला मिळेल असंही हवामान विभागाने म्हटल आहे. तर जम्मू-काश्मीर, लडाखच्या काही भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. दक्षिण आणि उत्तर भारतात आज पावसाची शक्यता असली तरी, महाराष्ट्रात आज हवामान कोरडं राहणार आहे. काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे शेतमालावर रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Comment