पॉवर टिलरसाठी अर्ज कुठे करायचा?
आपण महा डीबीटी पोर्टल (Farmer Maha DBT Portal) वरती ऑनलाईन अर्ज करू शकता. किंवा जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र इ. या ठिकाणी जाऊन आपला अर्ज भरू शकता.
महत्वाचे : मोबाईल वरून अर्ज करताना
आपल्या https://mahadbtmahait.gov.in/ पोर्टल वरती नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक/जोडलेला असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण जवळील सुविधा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करू शकता.