व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

प्रधानमंत्री उज्वला योजना ऑनलाइन अर्ज

  • सर्वात प्रथम आपणास प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अधीकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • वेबसाईट वर गेल्यावर नवीन उज्ज्वला २.० कनेक्शनसाठी अर्ज करा वर क्लिक करावे लागेल.
pradhanmantri ujwala yojana home page
  • आता तुमच्या समोर या योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे याची माहिती दिसेल त्याच्या खाली ऑनलाइन पोर्टलद्वारे वर क्लिक करावे लागेल.
pradhanmantri ujwala yojana online portal
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील गॅस वितरक (HP, Bharat, Iden) यांपैकी एक निवडावा लागेल.
pradhanmantri ujwala yojana choose gas provider
  • त्यानंतर आपल्याला Type Of Connection मध्ये Ujjwala 2.0 New Connection पर्यायाला निवडायचे आहे त्यानंतर I hereby declare that वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच राज्य आणि तुमचा तालुका निवडायचा आहे आणि Show List वर क्लिक करायचं आहे.
pradhanmantri ujwala yojana choose state
  • आता आपल्याला तुमच्या परिसरातील गॅस वितरकांची यादी दिसेल त्यापैकी एका वितरकाला निवडायचे आहे आणि Continue बटनावर क्लिक करायचं आहे.
pradhanmantri ujwala yojana gas provider name
  • आता आपल्यासमोर एक दुसरे पेज खुलेल ज्यामध्ये तुम्हाला स्वतः चा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि Captcha टाकायचा आहे  आणि Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल तो टाकून Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
pradhanmantri ujwala yojana otp
  • आता आपल्याला New KYC वर क्लिक करून Normal KYC वर क्लिक करायच आहे त्यानंतर Proceed बटनावर क्लिक करायचा आहे.
  • Customer Migrate Family: जर तुही कोणत्या अन्य राज्यातून आले असल्यास Yes करावे अथवा No वर क्लिक करायचे आहे.
  • Family Identifire: तुम्हाला रेशन कार्ड पर्याय निवडायचा आहे.
  • Family Identifire Number: तुहाला तुमचा रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे.
  • Family IdentifireState: तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव टाकायचे आहे.
  • Type Of Schema: तुम्हाला तुमची वर्गवारी टाकायची आहे (Backward Class, SC / ST)
  • Scheme Documents Number: जर तुम्ही SC प्रवर्गातील आहात तर त्या प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे.
  • Document Issue Date: प्रमाणपत्र दिले गेल्याची तारीख टाकायची आहे.
  • Documents Issue At: प्रमाणपत्र जिथून दिले गेले त्या स्थानाचे नाव
  • Sub Category: तुमची Sub-Category टाकायची आहे.
  • आता तुम्हाला Proceed वर क्लिक करायचा आहे.
  • आता तुमच्या समोर नवीन Page उघडेल त्यामध्ये तुम्हाला I Understand वर क्लिक करायचं आहे.
  • तुमच्या घरातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींची माहिती आधार क्रमांकासहित भरायची आहे.
  • Ad New Family Member वर क्लिक करून तुम्ही कुटूंबातील इतर व्यक्तींची माहिती भरू शकता.
  • आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे.
  • आपल्या बँकेची माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर आपल्याला ५ किलोचा सिलेंडर किंवा १४.५  किलोचा सिलेंडर हवा ते भरायचे आहे.
  • त्यानंतर आपण जर ग्रामीण भागात राहत असल्यास Rural वर क्लिक करायचे आहे आणि आपण जर शहरी भागात राहत असल्यास Urban वर क्लिक करायचे आहे.
  • सर्व माहिती योग्य प्रकारे भरल्यावर आपल्याला Submit बटनावर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला उज्वला गॅस योजनेचा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्या मोबाईल वर आपण उज्वला गॅस योजनेअंतर्गत अर्ज केल्याचा एक Text Message येईल.
काही दिवसांनी आपण निवडलेल्या गॅस वितरण केंद्रातून आपल्याला फोन येईल आणि प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत आपल्या घरी गॅस कनेक्शन येईल.

Leave a Comment