व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

अखेर मनोज जरांगे उपोषण स्थगित; सरकारला दिला या तारखेपर्यंत वेळ

जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आठ दिवसानंतर उपोषण स्थगित केले आहे. सरकारच्या शिष्टमंडाळाच्या शिष्टाईला यश आले असून जरांगेंनी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, जरांगेंनी साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे यांची उपोषणामुळे प्रकृती खालावत होती. अशात सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकार गंभीर असून त्यासाठी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलवू, असं आश्वासन मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं. त्यानंतर अखेर मनोज जरांगे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला वेळ वाढवून देतो, असं जरांगेंनी जाहीर केलं. पण ही शेवटची वेळ असेल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल आणि सर्व गुन्हे मागे घेणार असाल तर आपण राज्य सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. यानुसार सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच, उपोषण मागे घेतले नसून स्थगित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर, साखळी उपोषण सुरुच राहणार आहे. तर, आरक्षण न दिल्यास मुंबईत धडकण्याचा इशाराही जरांगेंनी दिला आहे.

Leave a Comment