व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

जमिनीची मोजणी करायची आहे? मग असा करा अर्ज

शेतकऱ्यांची खरी ओळख ही शेत जमिनीवरून होत असते. शेतकऱ्यांकडे असलेल्या सातबाऱ्यावर त्यांच्याजवळ किती शेतजमीन आहे याची नोंद असते. पण अनेकदा असं होतं की सातबाऱ्यावर असलेली जमिनीची नोंद आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत पाहायला मिळते. अशा परिस्थितीत जमिनीच्या हक्कापोटी वादविवाद देखील होतात.

शेजारी असलेल्या शेतकऱ्यांसोबत वाद विवाद होतात आणि अनेकदा प्रकरण हाणामारीच्या घटना पर्यंत जाते. परिणामी शेतकऱ्यांना नाहक कोर्टकचेरीच्या फेऱ्यात अटकावे लागते. अशा परिस्थितीत, सातबारावर असलेली जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये जर तफावत असेल तर शेतकऱ्यांना शासकीय जमीन मोजणी करण्याचा सल्ला दिला जातो.

निश्चितच शासकीय जमीन मोजणी शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे मात्र जमीन मोजणी कशी करायची? यासाठी अर्ज कसा करायचा? यासाठी नेमकं शुल्क किती आकारला जातो यांसारख्या अनेक बाबी शेतकऱ्यांच्या पुढ्यात असतात. दरम्यान आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी या संदर्भातील सर्व आवश्यक बाबी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेत जमीन मोजणी साठी अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇

जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारल जात

हा सर्वात महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांकडून कायम विचारला जाणारा प्रश्न आहे. याचे उत्तर असं की जमीन मोजणीची फी ही जमिनीच्या क्षेत्रावर आणि किती कालावधीमध्ये जमिनीची मोजणी करायची आहे यावर अवलंबून असते.

जमीन मोजणी एकूण तीन प्रकारात होते साधी मोजणी, तातडीची मोजणी आणि अति तातडीची मोजणी अशा तीन प्रकारात याला विभागला गेल आहे. दरम्यान साधी मोजणी ही सहा महिन्यांच्या कालावधीत होते, तातडीची मोजणी ही तीन महिन्यांच्या कालावधीत होते तर अति तातडीची मोजणी ही दोन महिन्याच्या आतच पार पाडली जाते. मात्र या तिन्ही मोजणींसाठी जमिनीनुसार वेगवेगळी फी आकारली जाते.


मग आता या प्रकारानुसार जमीन मोजणीसाठी किती शुल्क लागेल? जर समजा एखाद्या शेतकऱ्याला आपल्या दोन एकर शेत जमिनीची मोजणी करायची आहे तर अशा शेतकऱ्याला साधी जमीन मोजणी करण्यासाठी म्हणजेच सहा महिन्यांच्या कालावधीत जमीन मोजणी करण्यासाठी दोन हजार रुपये शुल्क द्यावे लागेल.

जर समजा या शेतकऱ्याला तातडीची मोजणी म्हणजेच तीन महिन्याच्या कालावधीत मोजणी करायची असेल तर त्याला चार हजार रुपयाची रक्कम द्यावी लागेल.

तसेच जर या शेतकऱ्याला अति तातडीची जमीन मोजणी करायची असेल म्हणजेच दोन महिन्याच्या कालावधीत जमीन मोजणी करायची असेल तर या शेतकऱ्याला 6000 रुपये जमीन मोजणीसाठी शुल्क द्यावा लागेल.

शेतकरी बांधव शुल्काबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित तालुकास्तरावरील कार्यालयाला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

जमीन मोजणी साठी कोणती कागदपत्रे लागतात हे पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇

Leave a Comment