Property News : देशात तसेच राज्यात रोजाना लाखोंच्या संख्येने प्रॉपर्टीची खरेदी विक्री होत असते. घर, बंगला, फ्लॅट, जमीन, प्लॉट यांची खरेदी-विक्री होते. काही लोक प्लॉट, फ्लॅट, घर वास्तव्यासाठी घेतात. तर काही लोक यामध्ये इन्वेस्टमेंट करत असतात. अलीकडे जमिनीचे दर विक्रमी वाढले असल्याने जमीनीत इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.
रियल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील जमिनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. गुंतवणुकीसाठी जमीन आणि प्लॉट हा एक चांगला पर्याय आहे. मात्र जमिन, प्लॉट, घर किंवा मग इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करताना, ती मालमत्ता खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे जरुरीचे आहे. अन्यथा फसवणूक देखील होऊ शकते.
हेही वाचा:
अनेकदा मालमत्तेच्या रजिस्ट्री लोकांची फसवणूक होते. एकाच जमिनीची किंवा प्लॉटची रजिस्ट्री ही अनेकांच्या नावावर असल्याचे अनेक प्रकरणात उघडकीस आले आहे. अशावेळी लोकांना मोठा आर्थिक फटका बसतो. प्रॉपर्टीही हातातून निघून जाते आणि पैसाही वाया जातो. संपूर्ण आयुष्यभराची कमाई एका क्षणात निघून जाते.
यामुळे कोणत्याही जमिनीची खरेदी करण्यापूर्वी त्या जमिनीची माहिती काढणे जरुरीचे आहे. जमीन नेमकी कोणाच्या नावावर आहे, जमिनीचा मालकी हक्क कोणाकडे आहे याची माहिती सर्वात आधी काढावी लागते. आधी हे जाणून घेण्यासाठी लोकांना पटवारीकडे जावे लागत असे. पण आता ही माहिती ऑनलाइन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महसुल विभागाने आता जमिनीची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. आता जमिनीचा नकाशा, भुलेख, खातेवहीची प्रत इत्यादी रेकॉर्ड ऑनलाईन तपासले जाऊ शकतात. दरम्यान आज आपण ही माहिती ऑनलाईन कशी बघायची याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.