व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आपले सरकार वरून उत्पन्नाचा दाखला कसा काढावा

आपले सरकारवरुन अर्ज कसा करायचा?

● सर्वप्रथम ‘आपले सरकारवर’ च्या अधिकृत संकेस्थळावर भे द्या. येथे क्लिक करा

● लॉगीन झाल्याने नवीन पेज ओपन होईल त्या पेज वर तुम्हाला वेगवेगळे पर्याय किंवा विभाग पाहायला मिळतील.

त्या विभागातून महसूल विभाग तुम्ही निवडा.

● त्यानंतर ‘महसूल सेवा ‘ हा पर्याय निवडा आणि या पर्यायमध्ये ‘उत्पन्न प्रमाणपत्र किंवा मिळकत प्रमाणपत्र ‘ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

● त्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल, त्या पेजवर आवश्यक कागदपत्रांची यादी दिलेली आहे ती यादी व्यवस्थित वाचून घ्या.

कारण ती सर्व कागदपत्रे आपल्याला वेबसाइटवर अपलोड करावी लागणार आहेत.

● त्यानंतर मोबाईलमध्ये एक नवीन अर्ज ओपन होईल, यामध्ये तुम्हाला किती वर्षाचा उत्पन्न दाखला काढायचा आहे.

हेही नक्की वाचा:

(उदा. 1 वर्ष, 3 वर्ष) आणि का काढायचा आहे त्याचे कारण द्या आणि इतर माहिती अचूक पणे भरा.

● अर्जदाराला जर शेती असेल तर त्याविषयी माहिती भरा. त्यानंतर उत्पन्नाची माहिती भरा.

● जर तुम्ही तलाठी उत्पन्न दाखला अर्जासोबत जोडणार असाल तर तलाठी अहवाल हा पर्याय निवडा.

● त्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करा तसेच आपला फोटो आणि सही देखील अपलोड करा.

(आपण जी कागदपत्रे अपलोड करणार आहोत त्या कागदपत्रांची साइज 75 ते 500 केबीच्या दरम्यान असावी.)

● यानंतर अर्ज सादर करा तसेच अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा आणि शुल्क भरल्याची पावती सेव्ह करुन ठेवा.

Leave a Comment