वेब साईटद्वारे डाऊनलोड करा
जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला असेल, तर पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आयकर ई-फायलिंग वेबसाइट ही योग्य जागा आहे.
स्टेप १ – सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्यावी लागेल. 👇👇
आयकर ई-फाइलिंग वेबसाईट👇👇👇👇
स्टेप २ – त्यानंतर डाव्या बाजूला दिसणाऱ्या Instant E-PAN वर क्लिक करा.
स्टेप ३: आता Check Status/ Download PAN च्या खाली दिलेल्या Continue वर क्लिक करा.
स्टेप ४: आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. नंतर खाली दिलेल्या चेकबॉक्सवर मार्क करा आणि नंतर Continue वर क्लिक करा.
स्टेप ५: आता तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
स्टेप ६: आता OTP टाका आणि Continue वर क्लिक करा.
स्टेप ७: यानंतर दुसरी स्क्रीन दिसेल ज्यामध्ये View E-PAN आणि Download E-PAN हे पर्याय उपलब्ध असतील. यामधून Download E-PAN चा पर्याय निवडा.
स्टेप ८: नंतर Save the PDF file वर क्लिक करा. यानंतर तुमचं ई-पॅन डाउनलोड होईल.
तुम्हाला ई-पॅन डाउनलोड करण्याचा पर्याय दिसत नसल्यास, तुम्हाला मागे जाऊन Get New E-PAN चा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर दिलेली प्रोसेस फॉलो करा. याशिवाय, जर तुम्ही डाउनलोड केलेली PDF फाइल पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, तर त्याचा पासवर्ज म्हणून तुमची जन्मतारीख DDMMYYYY फॉरमॅटमध्ये टाकावी लागेल.