व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

व्यायाम-डाएट फॉलो करूनही वजन कमी होत नाही? मग आहारात कराच ४ मसाल्यांचा समावेश

आहारात करा किचनमधील ४ मसाल्यांचा समावेश, वजन होईल कमी, पोटही जाईल आत

लठ्ठपणा ही जरी जागतिक समस्या असली तरी, आपल्या आरोग्याची काळजी ही आपणच घ्यायला हवी. वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं विविध उपाय करून पाहतात. काही उपाय फोल तर काही उपायांमुळे वजन झरझर कमी होते. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएटला फॉलो करतात. काही लोकं जिममध्ये जाऊन घाम गाळतात. तर काही योगासने करून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहतात.

पण अनेकदा व्यायाम आणि डाएट काटेकोरपणे फॉलो करूनही वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी आपण किचनमधील काही मसाल्यांचा वापर करून पाहू शकता. आहारात या मसाल्यांचा समावेश केल्यामुळे चयापचय बुस्ट होईल. शिवाय वजनही कमी होण्यास मदत होईल

लठ्ठपणा ही जरी जागतिक समस्या असली तरी, आपल्या आरोग्याची काळजी ही आपणच घ्यायला हवी. वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं विविध उपाय करून पाहतात. काही उपाय फोल तर काही उपायांमुळे वजन झरझर कमी होते. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएटला फॉलो करतात. काही लोकं जिममध्ये जाऊन घाम गाळतात. तर काही योगासने करून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहतात.

वजन कमी करण्यासाठी खा ४ मसाले

मेटाबॉलिज्म बुस्ट करण्यासाठी आपण आपल्या आहारात ४ मसाल्यांचा समावेश करू शकता. दालचिनी, आले, लसूण आणि मोहरी हे मसाले चयापचय बुस्ट करतात. ज्यामुळे पचन सुधारते, व वजनही कमी होण्यास मदत होते.

दालचिनी

दालचिनीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. जे वजन कमी करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय त्यात थर्मोजेनिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरात उष्णता वाढते, व कॅलरीज बर्न होतात. नियमित दालचिनी खाल्ल्याने इन्शुलीनचे उत्पादन सुधारते. ज्यामुळे रक्तातील पातळी नियंत्रित किंवा कमी होण्यास मदत होते.

आलं

आलं फक्त जेवण किंवा चहाची चव वाढवण्यासाठी वापरण्यात येत नसून, याचा वापर वजन कमी करण्यासाठीही होऊ शकतो. दालचिनीप्रमाणेच आल्यामध्येही थर्मोजेनिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते, व कॅलरीज जलद गतीने बर्न होण्यास मदत होते.

लसूण

लसूण व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लोह आणि सोडियमने समृद्ध असतात. लसूण खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. लसणामध्ये ऍलिसिन असते जे चयापचय वाढवते, शिवाय फॅट बर्न करते. याशिवाय लसूण फॅटला एनर्जीमध्ये बदलण्याचे काम करते.

मोहरी

मोहरीचा वापर अनेक घरांमध्ये फोडणीसाठी होतो. यात जीवनसत्त्वे ए, बी-कॉम्प्लेक्स आणि सी तसेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिजे असतात. याशिवाय यातील पोषक घटक चयापचय बुस्ट करण्यास मदत करते.

Leave a Comment