व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

फेरफार उतारा कसा काढायचा

फेरफार उतारा कसा काढायचा?

  • फेरफार उतारा काढण्यासाठी तुम्हाला खाली क्लिक करून वेबसाईट वर जायचं आहे.👇👇👇👇
  • यानंतर महसूल विभागाचं आपला 7/12 नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
  • तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, इथं येऊन सातबारा, आठ-अ काढला असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
  • पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला इथल्या सेवांचा लाभ घेता येतो.
  • त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर Enter Mobile Number च्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की, OTP sent on your mobile असा मेसेज तिथं येईल.
  • याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच One Time Password म्हणजेच काही आकडे पाठवलेले असतात, ते जसेच्या तसे तुम्हाला Enter OTP च्या खालच्या रकान्यात टाकायचे आहेत.
  • त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • पुढे तुमच्यासमोर आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed eFerfar, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील.
  • यातल्या Digitally signed eFerfar या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
    त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीत फेरफार असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. 
  • यामध्ये सगळ्यात शेवटी सूचना दिलेली आहे की, Rs.15 will be charged for download of every eferfar. This amount will be deducted from available balance.
  • याचा अर्थ फेरफार उताऱ्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील, ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील.
  • आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स नसतं. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणं गरजेचं असतं.
  • ते कसे करायचे तर खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • तिथं एंटर अमाऊंट समोर 15 रुपये एवढा आकडा टाकायचा आहे आणि मग पे नाऊवर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तिथं असलेल्या छोटा डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग कन्फम बटन दाबायचं आहे.
  • त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम ॲप असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत.
  • पेमेंटसाठीची ही माहिती भरली की तुमच्या मोबाईलववर एक ओपीटी पाठवला जातो. तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर स्क्रीनवर your payment was successful याचा अर्थ तुम्ही 15 रुपये जमा केले आहेत, असा मेसेज येतो. इथं असलेल्या continue या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतल्या सातबारा उताऱ्याचं पेजवर तिथं ओपन होईल. 
  • पण आपल्याला फेरफार काढायचा असल्याने Digitally signed eFerfar यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, फेऱफार नंबर टाकायचा आहे. 
  • तुमच्या सातबारा उताऱ्यावरील हा फेरफार क्रमांक नमूद केलेला असतो.
  • शेवटी डाऊनलोड पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर RS.15 will be deducted from your available balance for Ferfar download, असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. त्याखालच्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार तिथं डाऊनलोड होईल.
  • यात सुरुवातीला फेरफाराचा क्रमांक, त्यानंतर अधिकाराच्या स्वरुपात काय बदल झाला, याची सविस्तर माहिती दिलेली असते. पुढे परिणाम झालेले गट क्रमांक आणि अधिकाऱ्याचं नाव आणि शेरा दिलेला असतो.
  • या उताऱ्यावर शेवटी स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, हा अभिलेख फेरफाराच्या डिजिटल स्वाक्षरीत 21-07-2021 रोजी डेटा वरून तयार झाल्यामुळे यावर कोणाच्याही सही-शिक्क्याची आवश्यकता नाही.

Leave a Comment