व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

युट्युब वर व्हिडिओ टाकून पैसे कमवा | earn money from YouTube.

आज काल आपण पाहतो की समाजामध्ये नोकरीचे प्रमाण हे खूप कमी झाले आहे त्यामुळे तरुण वर्ग कुठे ना कुठेतरी व्यवसायाकडे वळत आहे परंतु घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणामुळे प्रत्येक युवकाला व्यवसाय टाकने हे शक्य नाही. त्यामुळे आज आपण असा एक मार्ग पाहणार आहोत की ज्याच्या मदतीने यूट्यूबवर अगदी दोन ते तीन तास काम करुण शुन्य भांडवलात आपण घरात बसून ऑनलाइन पद्धतीने काम करून चांगले पैसे कमवू शकतो. तर खालील माहिती सविस्तर वाचा.

युट्युब वरून पैसे कमवा

तुम्ही user म्हणूनच यूट्यूब वापरुन ऑनलाइन व्हिडिओ पाहता, पण तुम्हाला माहिती आहे का आपण यूट्यूब वापरुनही भरपूर पैसे कमवू शकता. कसं ते पाहू या…

YouTube वापरुन, आपण आपल्या मोबाइल किंव्हा आपल्या लॅपटॉप वर जगभरातील व्हिडिओज पाहू शकतो. युट्यूब वेबसाईट जगात गूगलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ऑनलाईन व्हिडिओंच्या बाबतीत ही वेबसाइट पहिल्या क्रमांकावर आहे.

यूट्यूब चैनल उघडण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. 👇

यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्याबरोबरच युट्यूबवर व्हिडिओ अपलोडही केले जातात. यूट्यूबच्या लोकप्रियतेमुळे दररोज बरेच व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होतात त्यामुळे बरेच लोक यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतात आणि आपल्या टॅलेंट च्या जोरावर रातो रात स्टार बनतात. (How to earn money from youtube in Marathi)

उदाहरण : जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेती विषयी तुम्हाला संपूर्ण माहिती असेल तर त्या माहितीचा उपयोग करून तुम्ही युट्युब वरती व्हिडिओ बनवू शकता. म्हणजेच जर तुम्ही कांदा लागवड केली असेल तर त्याविषयी कांदा लागवड कशी केली जाते तसेच त्याचं खत व्यवस्थापन कस केल जात याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगायचे आहे. तुम्हाला ज्यापण क्षेत्रा विषयी किंवा विषयावरती माहिती असेल त्यावर तुम्ही माहिती ची वीडियो बनवू शकता. ( परंतु ज्यामध्ये तुमची आवड आहे असाच विषय तुम्ही निवडला पाहिजे म्हणजे जर तुम्ही शेतीविषयी व्हिडिओ बनवत असाल तर त्याच विषयी तुम्ही माहितीचे व्हिडिओ बनवले पाहिजे. काही लोक सुरुवातीला शेती विषयी व्हिडीओ बनवतात आणि त्यानंतर परत दुसऱ्या विषयावर व्हिडिओ बनवायला सुरुवात करतात ज्यामुळे आपल्या व्हिडिओ पाहणारी जी लोक असतात ती पुन्हा आपल्या व्हिडिओ पाहत नाहीत त्यामुळे आपल्या व्हिडिओचे लाईक आणि व्ह्यूज कमी होतात त्यामुळे ती व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जात नाही आणि त्यामधून आपल्याला पैसे देखील कमी भेटण्यास सुरुवात होते) त्यामुळे तुम्ही योग्य विषय निवडणे हे खूप गरजेचे आहे विषय कसा निवडला जातो त्याबद्दल तुम्ही युट्युब वर देखील माहिती पाहू शकता

यूट्यूब वर काम करुण पैसे कसे कमवायचे

मित्रांनो फेसबुक आणि व्हाट्सअप च्या डिजिटल जगात युट्युब चे देखील एक मोठे स्थान आहे. खूप सारी लोक युट्युब हे एक मनोरंजन म्हणून पाहतात परंतु त्यांना माहित नाही की युट्युब मधून देखील खूप सारी लोक पैसे हे कमवतात. तुम्ही आत्ता म्हणणार की शक्यच नाही युट्युब वरती कसे पैसे कमावता येतील परंतु तुम्ही कधी असा विचार केला का की आपण ज्या युट्युब वरती व्हिडिओ पाहतो त्या व्हिडिओ बनवण्याचा त्या व्यक्तीला काय फायदा होतो. त्या व्यक्तीला ती व्हिडिओ बनवून काहीतरी उत्पन्न मिळत असेल त्यामुळेच तर तो व्यक्ती ती व्हिडिओ बनवत असेल. मित्रांनो या ऑनलाइन जगात असंख्य प्रकारे ऑनलाईन काम करून पैसे कमवता येतात. त्यामधील एक म्हणजे युट्युब आणि या युट्युब वरती आपण व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतो. ते कसे ते आत्ता आपण पाहुया आता आपण संपूर्ण माहिती पाहूया की युट्युब वरती कसे काम करून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पैसे मिळतील.

यू-ट्यूब मधून पैसे कसे कमवायचे ?

यूट्यूबवरून पैसे मिळविण्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे गूगल Google AdSense. Google AdSense व्यतिरिक्त असे बरेच स्रोत आहेत ज्यातून आपण पैसे कमवू शकता.

परंतु YouTube वरून आपण तेव्हाच कमवू शकता जेव्हा आपल्याकडे YouTube चॅनेल असेल आणि त्या YouTube चॅनेलवर बरेच Subscribers असतील आणि आपल्या YouTube चॅनेलच्या व्हिडीओजला चांगले views असतील तरच आपल्याला YouTube मधून पैसे कमविण्यास सक्षम राहाल.

म्हणून यूट्यूब वरून पैसे कमवायचे असल्यास प्रथम YouTube वर आपले चॅनेल तयार करा आणि आपल्या चॅनेलचे Subscribers आणि आपल्या चॅनेलवरील व्हिडिओंचे Views वाढवा. आपल्याकडे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओंची चांगली संख्या असल्यास आपणसुद्धा यूट्यूब वरून बरेच पैसे कमवू शकता.

यूट्यूब चैनल उघडण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. 👇

यूट्यूब वर काम करुण पैसे कसे कमवायचे

मित्रांनो फेसबुक आणि व्हाट्सअप च्या डिजिटल जगात युट्युब चे देखील एक मोठे स्थान आहे. खूप सारी लोक युट्युब हे एक मनोरंजन म्हणून पाहतात परंतु त्यांना माहित नाही की युट्युब मधून देखील खूप सारी लोक पैसे हे कमवतात. तुम्ही आत्ता म्हणणार की शक्यच नाही युट्युब वरती कसे पैसे कमावता येतील परंतु तुम्ही कधी असा विचार केला का की आपण ज्या युट्युब वरती व्हिडिओ पाहतो त्या व्हिडिओ बनवण्याचा त्या व्यक्तीला काय फायदा होतो. त्या व्यक्तीला ती व्हिडिओ बनवून काहीतरी उत्पन्न मिळत असेल त्यामुळेच तर तो व्यक्ती ती व्हिडिओ बनवत असेल. मित्रांनो या ऑनलाइन जगात असंख्य प्रकारे ऑनलाईन काम करून पैसे कमवता येतात. त्यामधील एक म्हणजे युट्युब आणि या युट्युब वरती आपण व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतो. ते कसे ते आत्ता आपण पाहुया आता आपण संपूर्ण माहिती पाहूया की युट्युब वरती कसे काम करून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पैसे मिळतील

  • मित्रांनो युट्युब वर व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला गुगल ऍडसेन्सच्या मदतीने पैसे हे मिळतात. म्हणजेच की जेव्हा आपण एखादी युट्युब वरती व्हिडिओ पाहतो तेव्हा व्हिडिओच्या मध्ये असंख्य प्रकारच्या जाहिराती येत असतात ज्या तुम्ही पाहिले असतील आणि त्याच जाहिरातींमधून आपल्याला गूगल ऍडसेन्स हे पैसे देत असतं जितक्या जाहिराती आपल्या व्हिडिओला येतील तितके पैसे आपण व्हिडिओ मधून कमवू शकतो आणि जाहिराती तेव्हाच जास्त येतात, जेव्हा आपली व्हिडिओ जास्त लोक पाहतात म्हणजेच की एक लाख दहा लाख इतके लोक जर आपली व्हिडिओ पाहत असतील तर तेव्हा आपली कमाई देखील यातून लाखामध्ये होते. आणि जास्त लोक आपल्या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती सांगितली आहे ती योग्य माहिती असायला पाहिजे व ती माहिती कोणाकडून चोरून छापलेली नसायला पाहिजे.
  • आता तुम्हाला तर कळाले की google ऍडसेन्स च्या मदतीने आपल्याला पैसे मिळतात परंतु आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की किती लोकांनी जर आपली व्हिडिओ पाहिली तर आपल्याला किती पैसे मिळतील. तर तसे डायरेक्ट कुणालाही सांगता येणार नाही परंतु सरासरी जर तुमच्या व्हिडिओला कमीत कमी 40 ते 50 हजार व्यूज आले म्हणजेच तुमची व्हिडिओ जर 40 ते 50 हजार लोकांनी पाहिली तर त्यामधून तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये इतके मिळतात. त्यामुळे सुरुवातीच्या वेळेस तुम्हाला व्ह्यूज हे कमी येतील तर असं नाही की त्यामधून तुम्हाला पैसे हे मिळणार नाहीत पैसे हे तुम्हाला मिळतील पण थोडे मिळतील त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या व्हिडिओ  टाकायच्या आहेत. जेणेकरून तुमच्या भविष्यात खूप सार्‍या व्हिडिओ होतील आणि त्या वायरल झाल्या तर त्यामधून तुम्हाला त्याच्यातून खूप सारे पैसे मिळतील. युट्युब वर पैसे कसे मिळतात याबद्दल जर तुम्ही सविस्तर माहिती युट्युब वर व्हिडिओ पाहून पाहिली तर याबद्द्ल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. की की कशाप्रकारे युट्युब वरून पैसे कमवले जातात.
  • आणि एकदा काय तुमचा चॅनेल व्हायरल जाण्यास सुरुवात होईल म्हणजेच की तुमच्या व्हिडिओ ची माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल तेव्हा तुम्ही याच व्हिडिओच्या मार्फत अनेक प्रकारे पैसे कमवू शकता. म्हणजेच की जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमचा चॅनेल शेती विषयी असेल तर तुमच्याकडे जी लागवड होते. त्याची विक्री तुम्ही डायरेक्ट ऑनलाइन नंबर देऊन तुम्हाला हव्या असलेल्या भावात करू शकता आणि तुम्हाला ग्राहक देखील खूप प्रमाणात मिळतील.

तसेच तुमची प्रसिद्धी पाहून अनेक कंपन्या ह्या तुमच्याकडे त्यांच्या वस्तूंची जाहिरात तुमचे चॅनेलवर करण्यासाठी तुमच्याकडे येतील त्यामधून देखील तुम्हाला पैसे हे खूप मोठ्या प्रमाणात मिळतात (जसे की आपण एखादी व्हिडिओ पाहत असतो तर त्या व्हिडिओच्या मध्ये तो व्यक्ती एखाद्या ॲपविषयी किंवा एखाद्या वस्तूविषयी आपल्याला माहिती सांगत असतो म्हणजेच कि त्या वस्तूची किंवा  ॲपची तो जाहिरात करत असतो. तर तेव्हा त्या वस्तूची किंवा त्याची ॲपची जाहिरात करण्यासाठी कंपनी त्याला खूप पैसे हे देत असते. तर यामधून देखील आपल्याला पैसे मिळत असतात युट्युब वर प्रसिद्धी मिळाल्यानंतर  असंख्य मार्गाने आपल्याला पैसे कमावता येतात याबद्दल सविस्तर आपण एखादी युट्युब वर व्हिडिओ पाहून माहिती घेऊ शकता.

युट्युब वर व्हिडिओ टाकताना या गोष्टींचे काळजी घ्या

युट्युब वर व्हिडिओ हा आपण आपला स्वतःचा वैयक्तिक टाकणार कुणाचाही चोरून किंवा कोणाचाही व्हिडिओ आपण युट्युब वरती टाकणार नाही असे जर आपण केले तर आपल्या चैनल वरती एक कॉपीराईट स्ट्राईक येते म्हणजेच की आपल्याला माहिती दिली जाते की जर तुम्ही अशी व्हिडिओ पुन्हा टाकली तर तुमचा चैनल बंद होईल त्यामुळे आपण जी पण व्हिडिओ टाकणार ती स्वतः बनवूनच टाकणार कुणाचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनल वरती टाकणार नाही. परंतु आपण दुसऱ्याची व्हिडिओ पाहून त्यामध्ये काही ठराविक माहिती ॲड करून जर एखादी नवीन व्हिडिओ बनवली तर त्या व्हिडिओला कॉपरेट स्ट्राईक येत नाही त्यामुळे तुम्ही तशी देखील व्हिडिओ बनवू शकता कॉपीराईट स्ट्राइक संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही युट्युब वर सविस्तर व्हिडिओ पहा.

FAQ

युट्युबवर 1000 व्यूज वरती किती पैसे मिळतात

जर आपण सरासरी पकडलं तर भारतामध्ये एखाद्याचं नवीन यूट्यूब चॅनेल जर असेल तर त्याला 1000 व्यूज वरती 80 रुपयापासून ते 400 रुपये पर्यंत मिळतात.

युट्युबवर व्हिडिओ कशी बनवायची

युट्युब वर व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याकडे एखाद्या गोष्टीविषयी माहिती असायला पाहिजे त्या माहितीच्या विषयावर आपण आपला चैनल बनवून मोबाईल मध्ये व्हिडिओ काढून ती व्हिडिओ युट्युब वरती टाकू शकतो.

युट्युब वर सबस्क्राईबर कसे वाढवायचे

Youtube वर सबस्क्राईबर वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे आहे फेसबुक किंवा whatsapp अशा अनेक माध्यमातून आपल्याला आपला चैनल लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे त्यामधून आपले सबस्क्रायबर हे वाढतील.

युट्युब वरून कमवलेले पैसे कुठे मिळतात

युट्युब वरून कमवलेले सर्व पैसे हे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आपल्या बँकेच्या खात्यात जमा होतात.

Leave a Comment