व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? ओळखण्याची सोपी पद्धत;


वासावरून ओळखा

सिंथेटिक दूधनिर्मिती करताना साबणाचा वापर केलेला असतो, त्यामुळे अशा दुधाला साबणाचा वास येतो. हे दूध हाताच्या बोटांवर घेऊन घासलं असता, त्यातून फेस तयार होतो. याचाच अर्थ दूध भेसळयुक्त आहे.

जमिनीवर टाकून तपासा

खऱ्या आणि बनावट दुधाची तपासणी करण्यासाठी दुधाचे काही थेंब चिकट किंवा पॉलिश केलेल्या फरशीवर टाका. दूध शुद्ध असेल, तर त्याचे थेंब ओघळून मागे डाग राहतात. मात्र दुधात भेसळ असेल, तर त्याचे काहीच डाग राहत नाहीत.

हेही वाचा

खवा करून पाहा

दुधाची शुद्धता तपासण्यासाठी त्यापासून खवा तयार करूनही पाहू शकता. त्यासाठी दूध 2-3 तास मंद आचेवर उकळू द्या. ते करताना ढवळत राहा. नैसर्गिक दुधाचा खवा एकदम मऊसर बनतो. दुधात भेसळ असेल, तर त्याचा खवा कडक होतो.

लिटमस टेस्ट

दुधातली भेसळ ओळखण्यासाठी एक रासायनिक चाचणीही करता येते. बऱ्याचदा सिंथेटिक दुधाला नैसर्गिक दुधासारखी चव यावी म्हणून त्यात युरिया घातला जातो. ते ओळखण्यासाठी अर्धा चमचा दुधात सोयाबीन पावडर मिसळा. या मिश्रणात लिटमस पेपर (Litmus Test) घाला. लिटमस पेपरचा रंग लाल किंवा निळा झाला, तर दुधात भेसळ आहे हे लक्षात घ्या.

सिंथेटिक दूध तयार करताना त्यात खाद्यतेल, साबण, युरिया अशा घटकांचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या दुधाची चव कडवट असते व त्याचा वास साबणासारखा असतो. सिंथेटिक दुधामध्ये कोणतीही पोषणमूल्यं नसतात. उलट त्यापासून शरीराला अपाय होतो. अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे कर्करोग होण्याचा धोकाही असतो. युरियाचं शरीरातलं प्रमाण वाढलं तर मूत्रविकारही होऊ शकतात. या दुधाच्या सततच्या वापरामुळे हृदय व फुफ्फुसावर परिणाम होण्याची शक्यता असते.

लहान मुलांच्या आहारात दूध महत्त्वाचं असतं. त्या वयात दूध जास्त प्रमाणात आहारात असतं. अशा वेळी भेसळयुक्त किंवा सिंथेटिक दूध दिलं गेल्यास मुलांना भविष्यात गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं. त्यासाठी दुधाची शुद्धता घरच्या घरीच तपासणं गरजेचं आहे.

दुधात डिटर्जंट भेसळ

ही भेसळ पाहाण्यासाठी सर्वप्रथम थोडे दूध आणि पाणी समान प्रमाणात घ्या. त्याला नीट ढवळून हलवा असे केल्याने दुधाला फेस येईल, थोड्याप्रमाणात फेस येणे सामान्य आहे परंतु जास्त आणि साबणासारखा जास्त फेस आला तर समजुन जा की, यात डिटर्जंटची भेसळ केली आहे. या व्यतिरिक्त, आपल्या तळहातावर थोडे दूध चोळा. जर दुधात डिटर्जंटची भेसळ असेल, तर तुम्हाला तुमच्या हातावर स्निग्धपणा येईल.

युरियाचा वापर

युरियाचा वापर दूध घट्ट करण्यासाठीही केला गेला जातो. हे तपासण्यासाठी, तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये एक चमचा दूध घाला. त्यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूर पावडर घालून चांगले मिक्स करा. थोड्यावेळानंतर त्यात लाल लिटमस पेपर टाका, अर्ध्या मिनिटानंतर जर हा लाल रंग निळा झाला तर दुधात युरिया मिसळला आहे.

जर आपल्याला या पद्धतीने दुधाची गुणवत्ता ठरवता येत नसेल तर आपल्या जवळील लॅब मध्ये ही टेस्ट करू शकता.

Leave a Comment