व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

तुम्ही तुम्ही पीत असलेले दूध किती सुरक्षित आहे? त्यात भेसळ तर नाही ना ?दुधातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती

दूधाला पूर्णान्न म्हटलं जातं. अगदी बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण दुधाची हीच गरज आणि उपयुक्तता पाहून काही लोक काही नफ्यासाठी दुधात भेसळ करतात आणि लोकांच्या जीवाशी खेळतात. नुकतंच मुंबईतही असचा भेसळयुक्त दूधसाठा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे हे दूध पिशवीतील आहे. गोकूळ, अमूल अशा नामांकित दूध पिशव्यांमध्येही भेसळ आढळली आहे. या पिशव्या ब्लेडने कापून त्यात भेसळ करून त्या पुन्हा सीलबंद करण्यात आल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात आणलेलं दूध भेसळयुक्त तर नाही ना? याची खात्री करून घ्या

भेसळयुक्त किंवा सिंथेटिक दूध दिसायला साध्या दुधासारखंच असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सहज फसतात. दूध नैसर्गिक आहे की भेसळयुक्त हे काही सोप्या टिप्स वापरून ओळखता येतं.

दूध लहान मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असतं. तसंच दुधामुळे शरीरातली ऊर्जेची झीज भरून निघते. हाडांसाठी आवश्यक कॅल्शिअम दुधातून मिळतं. दुधातून शरीराला प्रथिनंही मिळतात. दुधातल्या पोषणमूल्यांमुळे आहारात दुधाला महत्त्वाचं स्थान आहे; मात्र अलीकडच्या काळात दुधामध्ये भेसळ होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसंच दुधाचा दर्जाही घसरला आहे. अशा प्रकारचं भेसळयुक्त किंवा सिंथेटिक दूध दिसायला साध्या दुधासारखंच असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सहज फसतात. दूध नैसर्गिक आहे की भेसळयुक्त हे काही सोप्या टिप्स वापरून ओळखता येतं. त्याबद्दल जाणून घेऊ या.

Leave a Comment