व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पोट सुटतंच चाललं? आठवड्याभरात कमी करण्यासाठी प्या हे ड्रिंक्स, दिसाल स्लिम-फिट

Drinks to Burn Belly Fat : सुटलेले पोट किंवा वाढत्या वजनामुळे तुम्ही देखील त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला काही ड्रिंक्स बदल सांगणार आहोत

Weight Loss Tips :
सतत एकाच जागी बसून राहाणे, वजन वाढणे, पोट पुढे येणे यासारख्या समस्या अनेकांना जाणवतात. कामामुळे जीमला जाणे किंवा व्यायाम करणे प्रत्येकालाच जमत नाही. अशावेळी काही जण खाणं-पिणे नियंत्रणात ठेवतात, परंतु, पोषणाच्या अभावामुळे इतर समस्यांना सामोरे जावे लागते.

सुटलेले पोट किंवा वाढत्या वजनामुळे तुम्ही देखील त्रस्त असाल आणि सतत निराशा येत असेल तर आम्ही तुम्हाला काही ड्रिंक्स बदल सांगणार आहोत. ज्याचा आहारात समावेश करुन आपण वजन कमी करु शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल

1. बडीशेपचा चहा

पचन आणि चयापचय वाढवण्यासाठी बडीशेप फायदेशीर आहे. जर तुम्ही आठवडाभर हे ड्रिंक प्यायला तर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर (Benefits) ठरेल.

2. सेलरी

पोटाशी संबंधित अनेक समस्यांसाठी सेलरी अधिक प्रभावी ठरेल. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही सेलरीचे पाणी पिऊ शकता. यामुळे भूक नियंत्रणात राहाते, पचन सुधारते.


3. ग्रीन टी

वजन कमी (Weight loss) करण्यासाठी ग्रीन टी अधिक रामबाण आहे. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक आपल्या आहारात (Food) याचा समावेश करतात. यामध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते ज्यामुळे चयापचय वाढण्यास मदत होते.

4. ब्लॅक टी

ब्लॅक टीमध्ये संयुगे असतात जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. यामध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण अधिक असते. तसेच यामध्ये अॅटिऑक्सिडंट असतात जे शरीराचे वजन कमी करण्यास मदत करतात.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Leave a Comment