व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आता BBF पेरणी यंत्र घेण्यासाठी मिळणार अनुदान ; BBF पेरणी यंत्र अनुदान योजना

BBF Machine Subsidy | बीबीएफ ही पेरणी करण्याची एक आधुनिक पद्धत असून याची पेरणी बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहायाने केली जाते. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना विविध बाबीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. आता बीबीएफ पेरणी यंत्रसुद्धा शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर खरेदी करता येणार आहे.

BBF पेरणी यंत्र अनुदान योजना

25 एप्रिल 2023 रोजी राज्य शासनामार्फत मागेल त्याला योजना या संकल्पनेचा GR निर्गमित करण्यात आल्या ज्याअतर्गत मागेल त्याला BBF पेरणी यंत्राचासुध्दा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अनुदान तत्वावर बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध करून दिलं जाणार आहे. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण याठिकाणी पाहुयात

BBF पेरणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇

बीबीएफ पेरणी पद्धतीचे फायदे

  • पावसाचे पाणी सऱ्यामध्ये मुरते त्यामुळे त्यामुळे त्याठिकाणी पाण्याचे संवर्धन होऊन दीर्घकाळासाठी याचा फायदा होतो.
  • अधिकच्या मोठ्या पावसामुळे पाण्याचा योग्य निचरा होऊन रुंद वरांबा तसेच दोन्ही बाजूंनी सरी यामुळे पिकासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.
  • मजुरांची तसेच वेळेची जवळपास 50-60 टक्के बचत होते.
  • सरासरी प्रतिदिन 5-6 हेक्टर बीबीएफ पेरणी यंत्राच्या साह्याने पेरणी करता येते.
  • पिकांतील अंतर जास्त असल्याकारणाने पिकाची अंतर मशागत करणे एकदम सोपे होते.

बीबीएफ पेरणी यंत्रासाठी अनुदान किती ?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना बीबीएफ पेरणी यंत्राच्या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. बीबीएफ पेरणी यंत्रासाठी खरेदी किमतीच्या 50 टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त 35 हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने MahaDBT फॉर्मर पोर्टलवर्ती अर्ज सादर करावा लागेल.

BBF पेरणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇

BBF पेरणी यंत्रासाठी किती अनुदान मिळणार ?

BBF पेरणी यंत्रासाठी जास्तीत जास्त 35,000 रु. अनुदान किंवा खरेदी रक्कमेच्या 50% अनुदान देण्यात येणार.

बीबीएफ पेरणी यंत्र अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

ही बीबीएफ पेरणी यंत्र योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

Leave a Comment