स्टेप १: सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर www.nvsp.in जा, आणि Voter Portal वर क्लिक करा.
स्टेप २: आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल, तुम्हाला Create an Account वर क्लिक करायचे आहे.
स्टेप ३: आता तुम्हाला एका नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल जिथे तुम्हाला नवीन वापरकर्ता म्हणून खाते नोंदणी करायची आहे, फॉर्म मध्ये तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाका.
स्टेप ४: आता नवीन पेज वर Send OTP बटन वर क्लिक करून, मोबाइल वर आलेला OTP खालच्या बॉक्स मध्ये टाईप करा.
स्टेप ५: आता तुम्हाला तुमच्या वोटर आयडी पोर्टलचा पासवर्ड सेट करायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा टाईप करा.
स्टेप ६: आता तुम्हाला वोटर आयडी पोर्टलवर स्वागत असलेला मेसेज येईल
नोंद: भविष्यात वोटर आयडी पोर्टलवर लॉगिनसाठी, तुमचा मोबाइल नंबर आणि वरती तयार केलेला पासवर्ड वापरा.
स्टेप ७: तुमची बेसिक माहिती टाईप करा.
- नाव
- आडनाव
- राज्य
- लिंग
स्टेप ८: आता नवीन पेजवर, नवीन मतदार कार्ड नोंदणी करण्यासाठी New Voter Registration वर क्लिक करा
स्टेप ९: तुम्हाला नवीन पेज वर, नवीन मतदार कार्ड नोंदणीसाठी काही माहिती दिली जाईल. खाली असेलेल्या Let’s Start बटन वर क्लिक करा.
स्टेप १०: प्रश्न (Are you applying for the Voter ID first time ? / तुम्ही पहिल्यांदाच मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करत आहात ?)
उत्तर: आता तुमच्या समोर दोन पर्याय येतील, त्यातील (Yes, I applying for the first time / होय, मी प्रथमच अर्ज करत आहे) बॉक्स वर टिक करून Save & Continue बटन वर क्लिक करा.
स्टेप ११: प्रश्न (Are you citizen of India ? / तुम्ही भारताचे नागरिक आहात का?)
उत्तर: आता तुमच्या समोर दोन पर्याय येतील, त्यातील (Yes, I am an Indian Citizen, residing in India / होय, मी एक भारतीय नागरिक आहे, भारतात राहतो)
स्टेप १२: या स्टेप मध्ये वय आणि जन्मदिनांक तपासणी असणार आहे त्यासाठी काही डॉक्युमेंटसची गरज आहे. यासाठी खाली दिलेल्या कोणत्याही डॉक्युमेंट पैकी, कोणतेही एक स्कॅन (किंवा क्लिअर फोटो काढून) करून खालच्या बटनला (Upload) क्लिक करून अपलोड करा.
आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, मार्कशीट ज्यावर जन्मतारीख आहे अशी इयत्ता १० / इयत्ता ८ / इयत्ता ५, जन्म प्रमाणपत्र
नोंद: जर आपले वय २१ वर्षपेक्षा जास्त असेल तर खाली असलेल्या Age Declaration फॉर्म डाउनलोड करून, प्रिंट काढून पूर्ण फॉर्म हाताने लिहून परत स्कॅन करून अपलोड करावे.
स्टेप १३: आता मतदान ओळखपत्रावर जे काही छापून येणार आहे त्याची माहिती तुम्हाला भरायची आहे जसे पासपोर्ट साईझ फोटो, पूर्ण नाव, दिव्यांग असेल तर, इत्यादी.
स्टेप १४: आता तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीची माहिती द्यायची आहे, ज्या व्यक्तीकडे आधीपासून मतदान ओळखपत्र आहे त्याची.
- वोटर आयडी
- नाव
- आडनाव
- आणि शेवट त्या व्यक्तीसोबत असलेले तुमचे नाते सिलेक्ट करा
आणि Save & Continue बटन वर क्लिक करा.
स्टेप १५: आता शेवटची स्टेप म्हणजे ऍड्रेस तपासणी या मध्ये टाकायची माहिती अशी
१) घराचा नंबर २) भाषा ३) पत्ता ४) पोस्ट ऑफिस ५) गाव ६) क्षेत्र प्रकार ७) पिन कोड, या नंतर तुमचा मतदारसंघ निवडा
स्टेप १६: आता ऍड्रेस तपासणीसाठी काही डॉक्युमेंटसची गरज आहे. यासाठी खाली दिलेल्या कोणतेही एक स्कॅन (किंवा क्लिअर फोटो काढून) करून खालच्या बटनला (Upload) क्लिक करून अपलोड करा.
बँक पासबुक, रेशन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, भारताचा पासपोर्ट, भाडे करार, सध्याचे पाणी/लाईट/गॅस/फोन बिल इत्यादी
स्टेप १७: आता शेवट Declaration चा भाग आहे, यामध्ये तुम्ही वरती दिलेल्या पत्यावर तुम्ही कधीपासून राहता ते सिलेक्ट करा वर्ष / महिने. तुमचे सध्याचे ठिकाण आणि नाव टाकून Save & Continue बटनावर क्लिक करा.
आता तुम्ही दिलेल्या सर्व माहितीचा एक फॉर्म तुमच्यासमोर येईल, तुम्ही तो पूर्ण चेक करा काही चुकीचे असल्यास Edit Form वर क्लिक करून तुम्ही चूक सुधारू शकता, जर पूर्ण फॉर्म बरोबर असेल तर Submit बटनावर क्लिक करा. आणि शेवट नवीन पेज वर, तुमचा फॉर्म यशस्वीरित्या नोंदणीकृत झाल्याचा मेसेज येईल.
अशा पद्धतीने तुम्ही नवीन Voter ID साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर साधारण १५ दिवसामध्ये कागदपत्रे तपासणी होईल आणि मतदान कार्ड तयार झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाइल वर येईल, तुम्ही त्याच डॅशबोर्ड वर कार्ड तयार झाल्यानंतर त्याची डिजिटल कॉपी डाउनलोड करू शकता.