व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Manoj Jarange: एक मराठा , लाख मराठा! अंतरवाली सराटीच्या सभेतील गर्दी बघून मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज गेल्या अनेक दिवसांपसून लढा देत आहे. आरक्षणासह कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. आज आंतरवाली सराटी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेतील मराठा बांधवांची गर्दी पाहून मनोज जरांगेंना अश्रू अनावर झालेत.

अंतरवाली सराटी गावात आज जंगी सभेचे आजोजन करण्यात आलं आहे. या सभेला सकाळपासूनच लाखोंच्या संख्येने मराठा जनसमुदाय उपस्थित राहिलाय. मराठ्यांचा लाखोंचा जनसमुदाय पाहून यावेळी जरांगेंना काहीवेळ अश्रू अनावर झाले.

मनोज जरांगे यांनी ११.३० वाजता मराठा बांधवांना संबोधित करण्यास सुरूवात केली. दुपारच्या उष्णतेमुळे मनोज जरांगे यांनी सभेसाठी टाकण्यात आलेला मंडप काढण्यास सांगितला. मंडप काढल्यानंतर उन्हामुळे दोन व्यक्तींची प्रकृती बिघडली. त्यामुळे सभास्थळी तात्काळ अॅम्बुलन्समधून उपचार देण्यात आलेत.

राज्यात सध्या ऑक्टोबर हिट सुरू आहे. या हिटसह दुपारी १२ च्या सुमारास सभा सुरू असल्याने उन्हाचा तडाखा वाढला आहे. मात्र तरी देखील मनोज जरांगे पाटलांच्या सभेला लाखोंच्या सभेने मराठा समाज एकवटला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे ४० दिवसांचा वेळ मागितला होता. या काळात आपण आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू असं आश्वासन देखील राज्य सरकारने दिलं होतं. आता ३० दिवसांचा कालावधी आज संपला आहे आणि फक्त १० दिवस शिल्लक आहेत. मात्र अद्याप आरक्षणाचा तिढा सुटलेला दिसत नाहीये. त्यामुळे मनोज जरांगेंनी आज पुन्हा एकदा भव्य सभा घेतली आहे. जरांगे या सभेत काय बोलणार आणि पुढे काय निर्णय घेणार याकडेच संपूर्ण रज्याचं लक्ष लागलंय.

Leave a Comment