केंद्र आणि राज्य सरकारकडून नेहमी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत असतात. या सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम उत्पन्नाची अट निश्चित केली जाते. विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठरवून देण्यात येत असते.
शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना देखील विविध सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तसेच शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर उत्पन्नाचा दाखला आवश्य जमा करावा लागतो.
परंतु हा अतिमहत्वाच्या दाखला कसा काढायाचा ? हा दाखला कुठे मिळतो ? तर उत्पन्नाचा हा दाखला आपल्या तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात मिळतो किंवा आपले सरकार पोर्टलवरुन आपण उत्पन्नाचा दाखला काढू शकतो.
उत्पन्नाचा दाखला कुठे मिळतो ?
उत्पन्नाचा दाखला म्हणजेच मिळकत प्रमाणपत्र हे आपल्याला तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात मिळतो किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या ‘आपले सरकार ‘ या पोर्टलवर ऑनलाइन देखील उपलब्ध होतो.
उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇
या पद्धतीने आपल्याला जो पर्याय अधिक योग्य वाटतो त्या पद्धतीने आपण उत्पन्नाचा दाखला मिळवू शकतो.
आपले सरकार वरून अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇👇👇👇
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे
● ओळखीचा पुरावा म्हणून पुढील पैकी एक कागदपत्र (आधारकार्ड, पॅन कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड).
● अर्जदाराचा फोटो.
● पत्ता दर्शवणारा पुराव्यापैकी एक कागदपत्रं. (ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, पाणी बील, वीज बील, सातबारा किंवा 8 अ उतारा)
● जर आपल्याला वैद्यकीय कारणासाठी उत्पन्नाचा दाखला गरजेचं असेल तर वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे.
हेही नक्की वाचा:
स्वंयघोषणापत्र
स्वंयघोषणापत्र हे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी भरु द्यावं लागते. तसेच स्वंयघोषणापत्र हे सर्वांसाठी अनिवार्य आहे आणि ते आपल्याला अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.
उत्पन्न दाखवणारी कागदपत्रं
मंडल अधिकाऱ्याचा तपासणी अहवाल, प्राप्तिकर परतावा भरल्याचं प्रमाणपत्र, निवृत्त पेन्शनधारकांसाठी बँक प्रमाणपत्र, नोकरदारांसाठी फॉर्म नंबर 16, शेतकरी असल्यास 7/12 आणि 8 अ चा उतारा.