व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Maharashtra Weather update: राज्यात हिवसाळा; आज पासून ‘या’ भागात पावसाचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

वायव्य, तसेच उत्तर भारतात आदळणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम थेट मध्य प्रदेश, गुजरातमधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत झाला असून या दोन्ही हवामान प्रणालीचा परिमाण म्हणून राज्यात २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान, अनेक भागात पाऊस पडणार आहे.

हिवसाळा

Maharashtra Weather update:

वायव्य, तसेच उत्तर भारतात आदळणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम थेट मध्य प्रदेश, गुजरातमधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत झाला असून या दोन्ही हवामान प्रणालीचा परिमाण म्हणून राज्यात २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान, अनेक भागात पाऊस पडणार आहे.

हेही वाचा

पूर्वेकडील कमी दाबाची रेषा मालदीव पासून दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे आग्नेय दिशेकडून येणारे वारे म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यांमध्ये दक्षिण भागात भागाकडून आर्द्रता येत आहे. यामुळे पुढील दोन-तीन दिवसानंतर उत्तर महाराष्ट्र व लगतच्या गुजरात वर व मध्य प्रदेशात विंड इंटरॅक्शन अपेक्षित आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण गोवा, मराठवावाडा आणि विदर्भात काही जिल्ह्यात आज पासून पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यातील उत्तर विभाग व आजूबाजूच्या भागात म्हणजे गुजरात मध्य प्रदेश व राजस्थानच्या आग्नेय भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरीक पावसाची अनुभूति घेणार आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. मुंबईत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांपासून अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तर २५ नंतर मुंबई, ठाणे, पालघर येथे मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत शुक्रवारपासून पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारपासून रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशीव येथेही पावसाची शक्यता आहे.

कोकणगाव मध्य महाराष्ट्र व मराठवाडा येथे तुरळक तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ तारखेनंतर २७ तारखेपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच एक दोन पावसाच्या तीव्र सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच एक ते दोन पावसाच्या तीव्र सरी पडण्याची शक्यता आहे. २४ ते २७ तारखेला संपूर्ण भागामध्ये तुरळ ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित हलक्या स्वरपूच पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ ते २९ तारखेपासून कमी होणार आहे.

पुणे व आजूबाजूच्या परिसरात आजपासून आकाश अंशता ढगाळ राहणार आहे. २५ तारखेनंतर आकाश सामान्यतः ढगाळ राहील राहील. उद्या पासून अटी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ ते २७ पर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आहे. तर पावसाच्या एक दोन तीव्र सरी पडण्याची शक्यता आहे. २८ तारखेनानंतर पाऊस कमी होणार आहे. तसेच सामान्य तापमानात वाढ होणार आहे. तसेच कमाल आणि किमान तापमान कमी असल्यामुळे थंडी जाणवणार आहे.

Leave a Comment